आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘RaanBaazaar’ on ‘Planet Marathi OTT’ from May 20′ रानबाजार’ ही वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे.

या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.

या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, ” आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षय ला वाटला. आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.”

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसिरीजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसिरीज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल.

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ओटीटी जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment