प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड (Shravan Rathod) यांचं करोना व्हायरसमुळे काल रात्री निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी इस्पितळात भरती करण्यात आले होते. तेव्हाच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्रवण यांना करोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. किर्ती भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता व  त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच त्यांना हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या होत्या.  त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते. यासंबंधीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते. (Shravan Rathod Of Music Composer Duo Nadeem-Shravan Dies Of COVID-19).

संगीतकार नदीम सैफी यांच्याकडून वृत्ताला दुजोरा

संगीतकार नदीम सैफी यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय. ते म्हणाले, “माझे शानू आता राहिले नाहीत. आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र घालवले. आम्ही अनेक यशोशिखरंही पाहिली. आम्ही एकमेकांकडे बघूनच मोठे झालो. आमचा संपर्क कधीच तुटला नाही, अशा भावनाही नदीम सैफी यांनी व्यक्त केल्या.

१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली.  या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.

nadeem shravan

Website | + posts

Leave a comment