सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाने (एसपीएन) वृक्षारोपण प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍था सेट्रीजसोबत (SayTrees) सहयोग केला आहे. (Sony Pictures Networks joins hands with SayTrees for a greener planet) एसपीएन व सेट्रीज यांनी सहयोगाने महाराष्‍ट्राच्‍या दुष्‍काळग्रस्‍त सातारा जिल्‍ह्यामधील तीन एकर जमिनीवर घनदाट वनीकरणाच्‍या माध्‍यमातून ८००० हून अधिक विविध रोपट्यांच्‍या स्‍थानिक प्रजातींची लागवड केली आहे. (The network has plantedover 8000 tree saplings in Satara, Maharashtra)या रोपटांची लवकरच वाढ होऊन तेथे एक नैसर्गिक हरित आच्‍छादन बनेल. या प्रकल्‍पाचा पर्यावरणीय स्थिरता आणि वातावरणीय बदलाचा सामना करत जीवनाचा दर्जा सुधारण्‍यावर भर आहे.

सेट्रीजसोबतचा सहयोग सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाच्‍या या पर्यावरण व भूमातेचे संरक्षण करण्‍यासह पर्यावरणाचे संवर्धन करण्‍याच्‍या महत्त्वाबाबत इतरांना जागृत करण्‍याच्‍या थोर कार्याला अधिक प्रगतीपथावर घेऊन जातो. हा वृक्षारोपण प्रकल्‍प काळजी घेईल कीलागवड करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक रोपट्याकडे आवर्जून व वैयक्तिक लक्ष दिले जाईल आणि वृक्षाची वाढ व पर्यावरणाच्‍या संवर्धनाला चालना देण्‍यासाठी सुयोग्‍य जागा मिळेल.

SPN plants 8000 tree saplings in Satara Maharashtra

एन. पी. सिंग, व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडिया (एसपीएन) म्हणाले की, ”एसपीएनमध्‍ये आम्‍ही सातत्‍याने शाश्‍वत विश्‍वाची निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यामुळे वातावरणीय बदलाचे परिणाम कमी करण्‍यामध्‍ये मदत होते. आम्‍ही आमच्‍या सीएसआर उपक्रमाच्‍या पर्यावरणीय आधारांतर्गत या पर्यावरणीय उपक्रमाच्‍या माध्‍यमातून उज्‍ज्‍वल भविष्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍हाला आनंद होत आहे की, सेट्रीजने आमच्‍यासह आम्‍ही हरित आच्‍छादन विस्‍तारित करण्‍याच्‍या उद्देशाच्‍या जवळ पोहोचत असताना ‘नर्चरिंग ए हेल्‍दीयर प्‍लॅनेट’ या आमच्‍या मिशनमध्‍ये सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्‍हणून एसपीएन पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्‍या अनेक भागधारक, इंडस्‍ट्री व नॉन-इंडस्‍ट्री सदस्‍यांना रोपट्यांचे वाटप करेल आणि या थोर कार्यासाठी व्‍यापक समुदाय निर्माण करण्‍याच्‍या माध्‍यमातून जागरूकता निर्माण करेल.” 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.