आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अकॅडमी पुरस्कार विजेता ‘फॉरेस्ट गंप’चे अधिकृत हिंदी रिमेक असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha Film) या वर्षी नाताळात प्रदर्शित होत आहे. मागील काही वर्षांमध्ये, आमिर खान प्रोडक्शन्सने भारतीय प्रेक्षकांना अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत ज्यामध्ये ‘लगान’, ‘तारे जमीन पर’ आणि ‘दंगल’सारख्या चित्रपटांनंतर, आता बहुप्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ सामील होत आहे. (Shooting of Aamir Khan Productions ‘Laal Singh Chaddha’ starring Aamir Khan and Kareena Kapoor Khan is complete)

‘लाल सिंह चड्ढा’ हा कॉमेडी-ड्रामा आपल्या घोषणेपासूनच अनेक योग्य कारणाने चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट सहा अकॅडमी पुरस्कार विजेता राहिलेला ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे ज्याने त्याकाळी चित्रपट वर्तुळात स्वतःला अधोरेखित केले होते. आमिर खान यातली प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारत असताना, दर्शक आता हे पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत की सुपरस्टारने तिला कसे आपलेसे केले आहे.

करीना कपूर खान अभिनीत, ‘लाल सिंह चड्ढा’चे चित्रिकरण मागील वर्षी सुरु करण्यात आले होते आणि त्याला देशभरातील विविध 100 स्थानांवर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईमध्ये पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने संपूर्ण कास्ट आणि क्रूने सेटवर एकत्र येऊन ‘आतापर्यंतच्या सर्वात लक्षवेधी चित्रपटाचे पूर्ण होणे’ साजरे केले.

आमिर खान प्रोडक्शन्स, वायकॉम 18 स्टूडियो आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून अद्वैत चंदन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ येत्या नाताळात प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment