सुमधुर आणि गुणगुणायला भाग पाडणारा ट्रॅक ‘आई बाबा’ला मिळाली रसिकांची तात्काळ पसंती!

‘वेल डन बेबी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर तो प्रेक्षकांमध्ये कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात पाहिला गेला. आता हीच उत्सुकता अधिक न ताणता या कौटुंबिक नाट्याचा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला असून तो देखील रसिकांची मने जिंकतो आहे. या साऊंड ट्रॅकमधील ‘आई-बाबा’ हे गाणं अतिशय सुंदर झालं असून ते जगात प्रेम आणि नवीन आयुष्य साजरे करण्याविषयी आहे, जे आपल्या जीवलगांसोबत आपल्याला देखील गुणगुणायला भाग पाडते.

या सुमधुर अल्बमविषयी बोलताना अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला की, “संगीत हा आमच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला सखोल असा अर्थ आहे. प्रसंगांना साजेशा असलेल्या या गाण्यांमुळे चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. रोहन-रोहन ही मराठी सिने क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी ‘वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे.”

‘आई-बाबा’ या प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्याला सिनेमात ओटी भरण्याची पार्श्वभूमी लाभली आहे. सिनेमातील दाम्पत्याला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या जीवनातील हा गोड भाग या गाण्यातून समोर येतो. प्रत्येक गाणे हे सर्जनशील लेखणीतून साकारले आहे. त्याचे चित्रीकरण देखील उत्तम झाले आहे” असेही पुष्कर म्हणाला.

‘आई बाबा’ हे गाणे अतिशय प्रतिभावंत अशा रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.

‘वेल डन बेबी’ हा सिनेमा प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला असून मर्मबंधा गव्हाणे याच्या लेखिका आहेत. या मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत तर व्हिडीओ पॅलेस सादरकर्ते आहेत.

भारतात प्राईम मेंबर्सकरिता 9 एप्रिल 2021 पासून हा सिनेमा स्ट्रीम होणार आहे.

गाण्याची लिंक:

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.