आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kangana Ranaut will play Indira Gandhi. The first look video of ‘Emergency’ released. इमर्जन्सी फर्स्ट लूक: अभिनेत्री कंगना रणौतने आज तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातील ती साकारत असलेल्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या रूपाचा तिचा पहिला-वहिला लूक प्रदर्शित केला आहे.

या फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये कंगना राणौत इंदिराजींचा लूक सारख्याच केशरचना आणि साडी मध्ये अगदी हुबेहूब रूपात दिसून येत आहे. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील गंभीर हावभाव, बोलण्याची व बघण्याची खास लकब, आवाजातील साम्य यातही कंगना ने बरीच मेहनत घेतली असल्याचे दिसून येत आहे. भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधींसारखीच अभिव्यक्ती पडद्यावर कंगना ने साकारली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. फर्स्ट लूक व्हिडीओ मध्ये जे दृश्य दाखविण्यात आले आहे ते पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९७१ सालच्या अमेरिका भेटी दरम्यानचे आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि इंदिरा गांधी यांच्यात अनेक कारणांमुळे तेंव्हा तणाव निर्माण झाला होता. ४ आणि ५ नोव्हेंबर १९७१ रोजी इंदिरा गांधींच्या भेटीपूर्वीही निक्सन यांनी भारत आणि त्यांच्याबद्दल  “निःसंशयपणे जगातील सर्वात अनाकर्षक स्त्रिया भारतीय स्त्रिया आहेत,” अशी असभ्य टिप्पणी केली होती. 

‘इमर्जन्सी’ हा पुढील वर्षी २०२३ मध्ये रिलीज होणारा आगामी चित्रपट आहे. हा १९७५ मध्ये देशात लागू झालेल्या आणीबाणी दरम्यान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. दिवंगत माजी पंतप्रधानांच्या भूमिकेत यापूर्वी अनेक अभिनेत्री आपण पाहिल्या आहेत, पण कंगना या भूमिकेत अविश्वसनीय दिसत आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः कंगना च करणार आहे.  पटकथा आणीन संवाद रितेश शाह यांचे आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना राणौतचा दुसरा बायोपिक

मणिकर्णिका फिल्म्सचा इमर्जन्सी हा कंगना राणौतच्या कारकिर्दीतील दुसरा बायोपिक आहे, तिचा पहिला ‘थलायवी’ आहे ज्यामध्ये तिने दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली होती. इमर्जन्सी चित्रपटाची निर्मिती तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment