आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर, धर्मा प्रॉडक्शनचा सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी अभिनीत शेरशाह हा चित्रपट आज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) च्या जीवनावर आधारित ह्या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (After Kesari and Raazi Dharma Production brings one more patriotic film Shershaah) 

आलिया भट्ट, विकी कौशल अभिनित राज़ी, आणि अक्षय कुमार फेम केसरी हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले होते आणि आता शेरशाह ला मिळणाऱ्या सकारात्मक समीक्षा आणि प्रेक्षकांची उत्सुकता पाहता हा चित्रपट ही त्याच मार्गावर जात असल्याचे दिसून येतंय.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपले ‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.