आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

कोरोना काळामुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. पण आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरणाला वेग आला आहे. अनेक नवे आणि दर्जेदार चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी  घोषणा झालेल्या ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. (Shooting at final stage for the Marathi film roop nagar ke cheetey)

बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह आणि युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी या जोडगोळीच्या ह्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली येणारा ‘रूप नगर के चीते’  चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच रोमांचक आणि वेगळा अनुभव असणार हे नक्की !

shooting at final stage for the marathi film roop nagar ke cheetey

‘रूप नगर के चीते’ हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.

पुणे आणि बंगळूर शहर परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी ही हटके कलाकृती आणण्यासाठी आम्ही पण तितकेच उत्सुक असल्याचे मनन शाह आणि विहान सूर्यवंशी सांगतात. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत काम केल्याचा आनंद आणि समाधान हे दोघंही व्यक्त करतात.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.