मोनालिसा बागल देणार ‘करंट’!! यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार!!

“झाला बोभाटा” आणि आगामी “भिरकीट”या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुप जगदाळे नवा चित्रपट घेऊन येत आहेत. अभिनेत्री मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका असलेला करंट हा चित्रपट २१ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. 
रेहा फिल्म प्रॉडक्शनच्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी “करंट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आलं. यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार अशी टॅगलाईन या टीजर पोस्टरवर आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘हॉट’ असण्याचा अंदाज बांधता येतो. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. “झाला बोभाटा” हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट होता. त्यामुळे “करंट” या चित्रपटातूनही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानीच मिळेल यात शंका नाही.
सिनेमा करताना आम्ही दोनच नियम पाळतो,आमचा  सिनेमा मनोरंजन करणारा असतो आणि पहिला नियम मी कधीच विसरत नसतो असे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले. चित्रपटातील स्टारकास्ट आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि निर्मात्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी सांगितलं. त्यामुळे आता मनोरंजनासोबतच गरमी वाढविणाऱ्या या “करंट” चित्रपटाची प्रेक्षकांना नक्कीच प्रतीक्षा राहील हे नक्कीच!
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.