– विवेक वि जोगळेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

धर्म देव पिशोरिमल आनंद अर्थात देव आनंद (Actor Dev Anand) यांचा (३ डिसेंबर) आज स्मृतीदिन आहे. २०११ मध्ये आजच्याच दिवशी वॉशिंग्टन मे फेयर हॉटेल लंडन इंग्लंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या प्रतिमेला ते इतके जपत की त्यांनी सांगून ठेवले होते की माझा मृत चेहरा दिसता कामा नये. अथवा अंत्यदर्शन कोणालाही होता कामा नये. (Remembering the Legendary Actor of Hindi Cinema, Dev Anand)

हिन्दी सिनेमा वर जवळ जवळ ६० वर्षे आपल्या अभिनयाने आणि सदाबहार छबी ने राज्य करणार्‍या देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाब च्या शककरगड येथे झाला. त्यांनी इंग्रजी विषयात लाहोर पाकिस्तान येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. सिनेमा मध्ये काम करायचे स्वप्न उराशी बाळगत ते १९४३ ला मुंबई ला आले. राहायला जागा नाही, कोणाची ओळख नाही अशा अवस्थेत खिशात केवळ रु ३०/-घेऊन एका हॉटेल मध्ये तिघा अन्य लोकांबरोबर राहू लागले.

उपजीविकेसाठी मिलिटरी सेन्सॉर ऑफिस मध्ये रु १६० महिना पगारावर नोकरी केली. आणि सिनेमात काम मिळवण्याचा संघर्ष सुरू झाला. त्यांना १९४६ मध्ये प्रभात स्टुडिओ च्या हम एक है या सिनेमात काम करण्याची संधि मिळाली. पण हा सिनेमा सपशेल आपटला आणि ते यातून दर्शकांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. या दरम्यान त्यांची ओळख गुरुदत्त यांच्याशी झाली. ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. त्यांनी ठरवले की गुरुदत्त दिग्दर्शित सिनेमात देव आनंद यांनी काम करायचे आणि देव आनंद निर्मित सिनेमाचे दिग्दर्शन गुरु दत्त यांनी करायचे. काही दिवसात त्यांना अशोककुमार यांच्या मदतीने बॉम्बे टॉकीज च्या जिद्दी सिनेमात काम करायची संधि मिळाली आणि मग त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९४९ मध्ये त्यांनी आपली स्वतःची नवकेतन कंपनी काढली. निर्माता देव आनंद यांनी गुरुदत्त यांना दिग्दर्शक म्हणून संधि दिली आणि या जोडीचा सिनेमा बाजी ने १९५१ मध्ये अपर सफलता मिळवली. त्यांचे मोठे बंधु चेतन आनंद आणि धाकटे बंधु विजय आनंद यांची त्यांना मोलाची साथ मिळाली.

नंतर त्यांनी काही सिनेमात नकारात्मक भूमिका पण केल्या. राज कपूर आवारा सिनेमा प्रदर्शित झाला त्या बरोबर देव आनंद यांचे राहीआंधीयाटॅक्सी ड्रायव्हर सिनेमा आहे. याचा सिनेमातिल अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याबरोबर त्यांचा विवाह पण झाला. त्यांना १९५६ मध्ये पुत्रप्राप्ती झाली त्याचे नाव सुनील आनंद ठेवले. नंतर एक कन्या पण झाली तिचे नाव देविना ठेवले. विद्या सिनेमात त्यांची सहकलाकार होती सुरेय्या. राजकपूर नर्गिस, दिलीप कुमार मधुबाला यांच्या प्रमाणे देव आनंद आणि सुरेय्या यांचे प्रेम प्रकरण पण गाजले. त्यांचे जीत शायर नमूना व उद्धार हे सिनेमा पाठोपाठ आले.

देव आनंद यांच्या विषयी रोचक माहिती प्रसिद्ध आहे:-

  • ते सिगारेट आणि दारू पित नसत.
  • त्यांनी मुमताज ला हरे रामा हरे कृष्णा सिनेमात विरोध पत्करून मुख्य भूमिका दिली. झिनत अमान या सिनेमात त्यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
  • त्यांनी १९७० च्या  होलीवूड च्या द एविल विन या सिनेमात पण काम केले होते.
  • १९६१ च्या जंगली सिनेमात आणि १९६६ च्या तिसरी मंजिल सिनेमात प्रथम देव आनंद काम करणार होते.
  • ९६५ चा गाईड सिनेमा हा त्यांचा अभिनय कारकीर्दीचा परमोच्च बिंन्दू म्हणावा लागेल.
  • महाबळेश्वर येतील फ्रेडरीक हॉटेल मध्ये ११ नंबरची रूम त्यांच्या साठी सदैव राखून ठेवलेली असायची.
  • पुण्यातील लकी हॉटेल ही त्यांचे अत्यंत आवडते होते.
  • काला पानी या सिनेमात देव आनंद यांनी काळा कोट घातला होता. तो विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय होता. त्याच्या या कोटावर बंदी घालण्यात आली होती.
  • त्याच्या केसांची कोंबडा स्टाइल ही फार लोक प्रिय होती.
  • १९७७ मध्ये त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला विरोध केला. पण त्यांचा हा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही.

त्यांनी अनेक अभिनेताअभिनेत्री, गीतकारसंगीतकारदिग्दर्शक यांना आपल्या निर्मिती संस्थेद्वारा सिनेक्षेत्रात संधी, नाव आणि कीर्ती मिळवून दिली.त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील किती सिनेमाची नावे घ्यावीत. तमाशा, जाल, पतीता, मिलाप, मुनीमजी, इंसानियतनौ दो ग्यारह, काला पानी, हम दोनो, असली नकली, जॉनी मेरा नाम, जितकी नावे घेऊ तितकी कमीच आहेत.

अभिनय क्षेत्रा कडून त्यांनी आपले लक्ष्य निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळवले. शरीफ बदमाश, बनारसी बाबू, छुपा रुस्तूम, इष्क इष्क इष्क, अमीर गरीब असे कितीतरी सिनेमा काढले पण ते फारसे चालले नाहीत. पण शेवटपर्यन्त त्यांचे एकपाठोपाठ एक सिनेमे येत राहिले. सिनेमा चालो अगर न चालो ते आपल्या पद्धतीने पुढे वाटचाल करत राहिले. आणि मग एके दिवशी दर्शकांसमोर आपली सदैव हसरी प्रतिमा ठेवून त्यांनी परदेशी प्रयाण केले आणि बघता बघता हे प्रसन्न व्यक्तिमत्व पडद्याआड गेले. ते कधीही परत न येणासाठीच. पण या अत्यंत देखण्या आणि प्रसन्न अभिनेत्याला त्याचे चाहते कधीही विसरणार नाहीत.

२००१ मध्ये त्यांना पद्मभूषण आणि २००२ मध्ये सन्मानाचे दादासाहेब फाळके पारितोषिक मिळाले होते. या सरकारी पुरस्काराबरोबर अपार लोकप्रियता लाभली. हिन्दी सिनेजगताला त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. या दिवशी त्यांना मानाचा मुजरा.

(स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे)

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Vivek V Joglekar
+ posts

Leave a comment