आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
स्टार प्रवाह (Star Pravah) कुटुंबाने एकत्र येऊन यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) जल्लोषात साजरा केलाय. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं जल्लोषात पार पडणार आहे. विशेष म्हणजे आनंद आणि आदर्श शिंदे आणि अजय अतुल यांच्या स्वरमधुर आवाजाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. बाप्पाची लोकप्रिय गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना घेता येईल. (Star Pravah’s family ready to welcome Ganpati Bappa with Great Enthusiasm in Ganeshotsav 2021)
गणेश वंदनेने होणार सुरुवात स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सवाची…
आपल्या Star प्रवाह परिवाराचा गणपती आहे…
नक्की यायचं…
‘Star प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’
रविवार १२ सप्टेंबर संध्याकाळी ७:०० वा. Star प्रवाहवर…#StarPravahParivaarGaneshotsav #StarPravahParivaar #StarPravah pic.twitter.com/FNEkW7IGtB— Star Pravah (@StarPravah) September 10, 2021
सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.
करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा