आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Animated video of the song “Dhangar Raja” launched on social media. साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने ‘सचिनमय ‘ नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील ‘सचिनमय ‘ या नावानेच रिलीज केला गेला. 

या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं . सगळीच गाणी हि लोकसंगीताचा बाज असलेली , पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं . या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं ‘धनगर राजा’ हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हंणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडिओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी आणण्याचं सागरिका म्युझिकने ठरवलं . आणि गुढी पाडव्याला या गाण्याचा अँनिमेटेड व्हिडिओ सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेल वर रिलीज केला गेला. मराठी मधील हा बहुतेक पहिलाच संपूर्ण अँनिमेटेड म्युझिक व्हिडीओ असेल.

सचिनजींनी पुन्हा एकदा त्यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रत्यय त्यांच्या गाण्यांतून गाण्यातून दिला आहे. ‘ सचिनमय  ‘ या अल्बम मधील सर्वच गाणी हि लोकगीताच्या बाजाची आहेत. जसं शेतकरी गीत, कोळीगीत, पेंद्याने आपल्या मित्रासाठी म्हणजेच श्रीकुष्णासाठी गायलेलं बोबडा गीतं, आणि धनगर राजा हे गीत. आणि हे प्रत्यक गीत सचिनजींनी त्या त्या गाण्याच्या बाजानुसार गायलं आहे, म्हणूनच हा अल्बम  ‘सचिनमय’ आहे. सचिनजींच्या आवाजातील धनगर राजाची हि गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.