The Marathi Film ‘Vadapav’ launched in London, will be directed by Prasad Oak

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. लंडनमध्ये नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

The Marathi Film 'Vadapav' launched in London

दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.” ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसंच, चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे. संगीतकार कुणाल करण ‘वडापाव’ या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment