आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
The Marathi film ‘Aalay Majhya Rashila’ produced by renowned architect Jyotirvid Anand Pimpalkar will hit the screens on February 10. वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटातून बारा राशींच्या अनोख्या गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. ‘आलंय माझ्या राशीला’ हा सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर निर्मित मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित आणि फिल्मास्त्र स्टुडिओ प्रस्तुत ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. नुकताच कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
याबद्दल बोलताना आनंद पिंपळकर सांगतात की, ‘आजवर मी वास्तूविशारद व ज्योतिषी म्हणून असंख्य जणांना मार्गदर्शन केलं पण चित्रपटाच्या माध्यमातून राशींच्या गमतीजमती प्रेक्षकांसमोर अधिक चांगल्या रीतीने दाखवता येतील या उद्देशाने मी या चित्रपटाची निर्मिती केली असून एका विशेष भूमिकेमध्ये मी यात दिसणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून त्यांच्यासोबतीला माझ्या मुलाचं प्रणवचं अभिनयाचं स्वप्न या चित्रपटाने साकारलं आहे.’
चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत.
‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे.