अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी लवकरच “मन उनाड उनाड…” या म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. अतिशय नितळ काव्य, उत्तम संगीत आणि नेत्रसुखद छायांकनाचा आनंद या म्युझिक व्हिडिओतून प्रेक्षकांना घेता येईल.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आऊल स्टुडिओज या म्युझिक व्हिडिओचे प्रस्तुतकर्ते आहेत. किरण कलकुंबे आणि विशाल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं मधुर शिंदे आदिती नेरूरकर यांनी गायलं आहे. तर सविता करंजकर जामले यांनी गीतलेखन केलं आहे. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे, तर अनिकेत यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होईल.

mann unaad unaad music video

“झाला बोभाटा”, “भिरकीट”, “बेभान” अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चमकली आहे, तर “एक सांगायचंय”, “टकाटक” अशा चित्रपटांतून अभिजित अमकरनं आपली छाप उटवली आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.