आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Legendary Music Director and Singer of Marathi Cinema, Swargandharva Sudhir Phadke’s, biopic Announced.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार, गायक सुधीर फडके यांचा चरित्रपट/बायोपिक असणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते, सुधीर फडकेजींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, स्वातंत्र्यवीर सावरकर मेमोरियल हॉल, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे मंगळवारी (दि २५ जुलै) सायंकाळी या चित्रपटाचा शुभारंभ झाला. 

सुधीर फडके हे मराठी चित्रपटसृष्टीत स्वरगंधर्व म्हणून ओळखले जातात. सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापुरात झाला. फडके यांनी कोल्हापुरातील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यांचे जन्मनाव राम फडके होते, पण नंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून सुधीर ठेवले. सुधीर फडके यांना मराठी चित्रपटसृष्टीत बाबूजी म्हणूनही ओळखले जाते. १९४१ मध्ये HMV मधून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर सुधीर फडके यांनी १९४६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या ‘गोकुळ’ या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आपल्या हयातीत त्यांनी हिंदी चित्रपटांसह १११ चित्रपटांना संगीत दिले.

swargandharva sudhir phadke

कवी ग.दि. माडगूळकर यांच्या श्लोकांवर आधारित ५६ गाण्यांचा समावेश असलेले ‘गीत रामायण’ हे सुधीर फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्यापैकी एक आहे. ही गाणी सुधीर फडके यांनी माणिक वर्मा, ललिता देऊलकर, लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे, राम फाटक, उषा अत्रे आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केली आहेत. ‘गीत रामायण’चे पहिले प्रक्षेपण ऑल इंडिया रेडिओ पुणे १ एप्रिल १९५५ रोजी रामनवमीच्या दिवशी झाले आणि एक वर्ष दर रविवारी ‘गीत रामायण’चे नवीन गाणे प्रसारित केले गेले. हा त्या काळातील सर्वात लोकप्रिय शो होता. गीत रामायण आसामी, बंगाली, इंग्रजी, हिंदी, कन्नड, कोकणी, सिंधी, तेलगू आणि मल्याळम अशा नऊ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

Legendary Music Director and Singer of Marathi Cinema Swargandharva Sudhir Phadke's biopic Announced. 

आयुष्याच्या शेवटच्या काळात सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपटही तयार केला. सुधीर फडके यांच्या जीवनात वीर सावरकरांचा खूप प्रभाव होता. गोवा स्वातंत्र्य चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्योत्तर लढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते ६० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. इंडिया हेरिटेज फाउंडेशनचे मुख्य प्रेरणास्थान आणि संस्थापक सदस्य सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी मुंबईत ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. 

सुधीर फडके यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन योगेश देशपांडे करत आहेत. योगेश देशपांडे म्हणतात, ‘बाबूजी इतके मोठे व्यक्तिमत्त्व होते की मी त्यांना संगीतकार आणि गायक म्हणून पाहिले आहे. सावरकरांवर चित्रपट बनवत असताना मी त्यांना पहिल्यांदा पुण्यात भेटलो. त्यावेळी माझे वय ११-१२ वर्षे असावे. मी लहानपणापासून बाबूजींचे गाणे ऐकत आलो आहे. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात लोक बाबूजींचीच गाणी गातात. जेव्हा मी त्याला ओळखू लागलो, तेव्हाच मला कळले की १५ वर्षापासून ते २५ वर्षांपर्यंतचा त्यांचा प्रवास किती कठीण होता. तेंव्हा गाणे गाण्यासाठी दोन रुपये मिळायचे. हे करत असताना त्यांनी कोलकाता (कलकत्ता) गाठले. जिथे त्यांना HMV मध्ये पहिला ब्रेक मिळणार होता पण काही घरगुती समस्येमुळे त्यांना परत यावे लागले होते”

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात ५ ऑगस्टपासून मुंबई, पुणे आणि भोर येथे सुरू होणार आहे. या चित्रपटात सुधीर फडके यांची २५ मूळ गाणी असणार आहेत. या चित्रपटात सुनील बर्वे सुधीर फडके यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांमध्ये मृण्मयी देशपांडे, शरद पोंक्षे, सागर तळाशीलकर, अपूर्व मोडक, धीरज जोशी, मिलिंद फाटक, सुखदा खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आदिश वैद्य हे तरुण सुधीर फडके यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठी भाषेत बनत असलेला हा चित्रपट हिंदीत डब करून डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.