आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Hrithik Roshan-starrer Koi Mil Gaya to re-release in theatres on August 4 after 20 years of it’s release.

या वर्षाच्या सुरुवातीला, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५) आणि ‘जब वी मेट’ (२००७) या चित्रपटांनी व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यात सिनेमागृहात पुनरागमन केले. गेल्या वर्षी, मेगा स्टार अमिताभ बच्चन च्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक अविस्मरणीय चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाले.

जरी हे सर्व चित्रपट ओटीटी अथवा टेलिव्हिजन वर उपलब्ध असले आणि वारंवार दाखवले जात असले तरी या सर्व चित्रपटांना सिनेमागृहात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शनास सज्ज असलेल्या ‘गदर-२’ च्या निमित्ताने निर्मात्यांनी काही आठवड्यांपूर्वी २००१ सालच्या पहिल्या ‘गदर’ ला पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित केले व तो सुद्धा हाऊसफुल्ल चालला.आता आणखी एक चित्रपट याबाबतीत आपले नशीब आजमावणार आहे. ह्रितिक रोशन अभिनीत ‘कोई मिल गया’ (२००३) या शुक्रवारी, ४ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

PVR Inox re-releasing Koi Mil Gaya after 20 years

हाती आलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या २० वर्षांच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून ‘कोई मिल गया’ पुन्हा रिलीज होणार आहे. हृतिक रोशन-प्रीती झिंटा स्टारर ८ ऑगस्ट २००३ रोजी रिलीज झाला होता. री-रिलीझ, जवळपास ३० प्रमुख शहरांमध्ये होणार आहे आणि मागणीनुसार प्रिंट्स वाढू सुद्धा शकतात. राकेश रोशन सध्या क्रिश-४ च्या पटकथेवर काम करीत आहेत व साधारणतः २०२४ मध्ये त्याची अधिकृत घोषणा होईल.

चित्रपटाचे कल्ट क्लासिक स्टेटस साजरे करणे आणि प्रेक्षकांना पुन्हा मोठ्या पडद्यावर जादू अनुभवणे ही कल्पना आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी याविषयी बोलतांना सांगितले की, “PVR आयनॉक्सच्या टीमने कोई मिल गया ची 20 वर्षे साजरी करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला. त्यांची योजना जाणून मला खूप आनंद झाला आणि आम्ही संयुक्तपणे भारतातील ३० शहरांमध्ये ४ ऑगस्ट रोजी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाचा नॉस्टॅल्जिया पुन्हा जिवंत करण्याचा आणि तो PVR आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार आहे. आम्हांला आशा आहे की, पालक आपल्या मुलांना सिनेमागृहात नेऊन नवीन पिढीला जादूची ओळख करून देतील.” राकेश रोशन दिग्दर्शित, ‘कोई मिल गया’ राकेश रोशनच्या फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शनद्वारे निर्मित आहे. हृतिक रोशन, प्रिती झिंटा, रेखा यांच्यासोबत जॉनी लीव्हर, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि बालकलाकार हंसिका मोटवानी, अनुज पंडित शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साय-फाय म्युझिकल कोई…मिल गया आणि भारतातील पहिला सुपरहिरो चित्रपट क्रिश फ्रँचायझी ही पहिली बहु-शैलीतील कथा फ्रँचायझी आहे जी त्याच्या आधीच्या भागांतील पात्रे आणि कथानकाला पुढे नेणारी आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment