आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Hardik Joshi’s “Club 52” on December 15

दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित “क्लब 52” हा चित्रपट १५ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

hardik joshi in club 52

चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment