आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
From September 4th, a new series ‘Premachi Goshta’ is starting on Star Pravah.
अलीकडेच तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार असल्याचं सांगितलं. ती मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट.
प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारणार असून राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत दिसेल. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
सुरू होतेय ‘प्रेमाची गोष्ट’
नवी मालिका. सोमवार ४ सप्टेंबरपासून रा. ८:०० वा. Star प्रवाह वर #PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah pic.twitter.com/L0txvvrKDw
— Star Pravah (@StarPravah) July 29, 2023
मुक्ता गोखले या व्यक्तिरेखेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत जवळपास १३ वर्षांनी पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होतोय. घराघरातील गृहिणी समरसून मालिका पहात असतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून कोणतंही पात्र साकारताना सामाजिक जबाबदारीचं भान राखण्याचा मी प्रयत्न करते. मुक्ता हे पात्रं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मुक्ता साकारतान माझ्यासमोर मुलगी, सून आणि आईच्या भूमिकेतला समंजसपणा जपण्याचं आव्हान असेल.’
मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, ‘या भूमिकेविषयी सांगताना शुभांगी ताई म्हणाल्या स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र, अग्निहोत्र २ आणि आता प्रेमाची गोष्ट. मालिकेची टीम खूप उत्तम आहे. या मालिकेचं लेखन हे बलस्थान म्हणता येईल. माधवी या पात्राच्या निमित्ताने साधेपणातलं सौंदर्य जपायला मिळेल.’