आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Big budget action-thriller movie “Ankush” hits the screens on October 6

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले “अंकुश” चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज “अंकुश” या बिगबजेट अॅक्शन-थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. पहिल्याच प्रयत्नात आव्हानात्मक भूमिकेचं दीपराजनं सोनं केलं असून, या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. “अंकुश” हा चित्रपट ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

दीपराजचं शिक्षण सुरू असून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचं सध्या तो शिक्षण घेत आहे. चित्रपटापूर्वी त्यानं अभिनय, नृत्य आणि किक बॉक्सिंगचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळ करण्याची इच्छा दीपराजने मनात बाळगली होती. पदार्पणाच्या भूमिकेविषयी दीपराज म्हणाला, की चित्रपटात अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका मिळाली. पहिल्याच चित्रपटात अशी भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. त्यामुळे शिकायलाही खूप मिळालं. फार थोड्या लोकांना अशी संधी मिळते. पहिलाच चित्रपट असल्याने स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे. किक बॉक्सिंगच प्रशिक्षण घेत असताना मला अनेक दुखा पती झाल्या तरी सुद्धा मी जिद्दीन ते प्रशिक्षण पूर्ण केले. अनुभवी सहकलाकारांमुळे अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची मी आतुरतेने वाट पहात आहे. “अंकुश” चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

या चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगांवकर, अभिनेते सयाजी शिंदे,मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगड़ी स्टारकास्ट आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment