आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Doobey’ the first song from the soundtrack of the movie ‘Gehraiyaan’  has been released. अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘गहराइयां’चा टायटल ट्रॅक आधीच सोशल मीडियावर ट्रेंड करत असून आता,  चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधून ‘डूबे’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

अंकुर तिवारी यांच्या द्वारे डिजाइन करण्यात आलेले हे  गीत कबीर कथपालिया उर्फ ​​ओएएफएफ आणि सवेरा यांनी रचले आहे. या गाण्याला कौसर मुनीर यांनी लिहिले असून लोथिका झा यांनी गायले आहे.

या पहिल्या गाण्याबद्दल बोलताना, अंकुर तिवारी म्हणाले, “’गहराइयां’चे संगीत त्याच्या कथेसाठी योग्य असावे असे मला सुरुवातीपासूनच वाटत होते जे प्रेक्षकांना या पात्रांच्या जगात घेऊन जाण्यास मदत करेल. कबीर, सवेरा आणि आमचे गीतकार कौसर, या सर्वांनी तरुणपणाचे सार जमवून आणण्याचे अभूतपूर्व काम केले आहे तसेच लोथिकाचा आवाज या गाण्यामध्ये योग्य प्रमाणात ताजेपणा आणि तीव्रता जोडतो.”

दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अमेझॉन प्राइम व्हिडियोवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे पाहिले गाणे ‘डूबे’ पाहण्यासाठी इथे क्लिक करा:

ओटीटी जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment