– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Fukrey 3 Movie Review

मित्रांनो १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली केवळ ८ कोटींमध्ये बनलेल्या फुकरे ने ४९ कोटींचा व्यवसाय केला होता आणि २०१७ साली आलेला त्याचा दुसरा पार्ट म्हणजे फुकरे रिटर्न्स चे बजेट होते २२ कोटी आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या वर कमाई केली होती. थोडक्यात स्वस्तात बनलेल्या या दोन्ही फुकरेंनी अनपेक्षित यश मिळवले होते आणि त्यामुळेच आज प्रदर्शित त्याचा तिसरा भाग म्हणजे ‘फुकरे ३’ कडून काहीशा अपेक्षा वाढल्या आहेत.

सुरुवातीला कथानकाबद्दल थोडक्यात- भोली पंजाबन (रिचा चढ्ढा) आता दिल्ली निवडणूक लढवणार आहे आणि तिच्या पाठीशी आहे दिल्ली ची टँकर लॉबी चालवणारा धिंग्रा (अमित धवन) आहे. चुचा (वरुण शर्मा), ज्याचे भोली वर प्रेम आहे, त्याच्याकडे भोलीने ही निवडणूक कशी जिंकावी याबद्दल ‘देजा चू’ आहे पण, त्याचे मित्र – हनी (पुलकित सम्राट), पंडितजी (पंकज त्रिपाठी) आणि लाली (मनजोत सिंग) – यांचा प्लॅन थोडा वेगळा आहे. त्यांच्या प्लॅन नुसार चुचा ने  भोली च्या विरुद्ध निवडणूक लढवावी आणि तिचा पराभव करावा कारण तो भोलीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. पण भोली हुशारीने या चौघांना आफ्रिकेला पाठवण्याची व्यवस्था करते. पण तिथूनही चुचा च्या देजा चू मुळे हे लोकं दिल्लीत परततात. मग पुढे काय होते? चूचा निवडणूक लढवतो का? लढविल्यास तो जिंकतो का? की भोली जिंकते ? अय सर्व प्रश्नांची उत्तरे देत चित्रपट शेवटपर्यंत पोहोचतो. 

काय विशेष- मित्रांनो आधीच्या दोन भागांप्रमाणेच याही भागाचे सादरीकरण दिग्दर्शक म्रिगदीप लांबा यांनी या फ्रांचायजी च्या सिली कॉमेडी या जॉनरला अनुसरून केले आहे. तुम्ही जर या फुकरे फ्रांचायजी चे चाहते नसाल आणि तुम्हाला जर लॉजिकल कॉमेडी आवडत असेल तर फुकरे ३ बघतांना तुमची निराशा होईल. मध्यंतरापर्यंत अत्यंत मंद गतीने पुढे सरकणारी कथा, मध्यंतरानंतर काहीशी वेग पकडते आणि मनोरंजक होते. वरुण शर्मा ने याहीवेळी आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेत चुचा रंजक रित्या साकारला आहे. वरुण शर्मा नंतर लक्षात राहतो तो पंकज त्रिपाठी चा पंडितजी. अगदी सहज अशा विनोदी शैलीने पंकज गेल्या दोन भागांप्रमाणे याहीवेळी मनोरंजन करतो. मंजोत सिंग चा लाली आणि पुलकित सम्राट चा हनी हे सुद्धा बऱ्यापैकी जमून आले आहेत. 

नावीन्य काय?- तसे पाहता कथानकात हिऱ्यापासून पेट्रोल बनविण्याचे काही सिली किंवा स्टुपिड वाटतील असे इनोव्हेशन्स सोडले, तर एकंदरीत सादरीकरणात मला काही एक नावीन्य नाही सापडले. या इनोव्हेशन्स बद्दल इथे जास्त विस्ताराने सांगितल्यास ते स्पॉयलर ठरेल. त्यामुळे नो कमेंट्स. 

कुठे कमी पडतो?- पटकथा म्हणावी तशी ग्रीप घेत नाही. मध्यंतरापर्यंत तर अनेक ठिकाणी चित्रपट स्लो असल्याचा फील येत राहतो. कथेच्या केंद्रस्थानी असलेले इलेक्शन म्हणजे निवडणूक हे प्रकरण काहीसे आऊटडेटेड, इमॅच्युअर आणि बाळबोध वाटते.  म्हणजे अनेक ठिकाणी विनोदावर म्हणावे तसे हसू येत नाही आणि उगाच बळजबरीने शाब्दिक कोट्या करून विनोदाची कृत्रिम पेरणी केल्यासारखी वाटते. चित्रपटभर एक प्रश्न विचारायची अजिबात सोय नाहीये आणि तो प्रश्न म्हणजे “याला काय लॉजिक आहे?” खरंतर फुकरे सिनेमांचे चाहते हा प्रश्न विचारणार नाहीच पण इतरांना मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधले तरी नाही मिळणार. तनिष्क बागची चे संगीत अत्यंत निराशाजनक आहे म्हणजे एकही गाणे हिट अय सदरात मोडणारे नाही. पार्श्वसंगीत, छायांकन आणि संकलन या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये सुद्धा चित्रपट अगदीच ऍव्हरेज आहे. वरुण शर्मा आणि पंकज त्रिपाठी यांच्या शिवाय इतर कलाकारांचा प्रेझेन्स तुम्हाला तितकासा जाणवत नाही. भलेही इतर सर्वानीच कामे ठीक केली असली तरी. त्यातल्या त्यात मंजोत सिंग आणि पुलकित सम्राट तरी ठीक आहेत पण रिचा चड्ढा हिचा अभिनय अगदीच मोनोटोनस म्हणजे एकच एक्स्प्रेशन चित्रपटभर घेऊन फिरताना रिचा दिसते. 

पाहावा का? – सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही या फुकरे फ्रांचायजी चे चाहते असाल तर हरकत नाही पण नसाल आणि तुम्हाला सेन्सिबल विनोदाची अपेक्षा असेल तर तुमची निराशा होऊ शकते. एवढेच कशाला फुकरे च्या चाहत्यांची सुद्धा काही प्रमाणात निराशा होऊ शकते अशी मला शंका आहे. 

स्टार रेटिंग – २.५ स्टार आउट ऑफ फाईव्ह. मला वैयक्तिकरित्या विचाराल तर खूपच ऍव्हरेज वाटला पण असे असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फुकरे  नावाच्या पुण्याई वर व्यवस्थित बिझनेस करेल याचीही शक्यता जास्त आहे. 

 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment