धडाकेबाज ‘दादला बुलेटवाला…’ संगीतप्रेमींच्या भेटीला. बघा धमाल गाणे इथे

मराठी सिने आणि संगीतसृष्टीनं नेहमीच जागतिक पातळीवर अलौकिक कामगिरी करीत जगभरातील संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य मराठीचा झेंडा फडवकत ठेवला आहे. यात मराठमोळ्या ठेक्यांवर ताल धरायला लावणाऱ्या चित्रपटगीतांपासून अल्बम आणि सिंगल्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांमधील डान्सरला मनमुराद नृत्य करायला लावणाऱ्या सर्वच गीतांचा मोलाचा वाटा आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत ‘दादला बुलेटवाला…’ हे धमाकेदार मराठी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. कोरोनाची गडद छाया धूसर होत असताना ऐन लग्नाच्या हंगामात आलेलं ‘दादला बुलेटवाला…’ हे सिंगल अबालवृद्धांना ठेका धरायला लावणारं आहे.

सिग्नेचर ट्युन्स आणि एबी एन्टरटेन्मेंटची संयुक्त प्रस्तुती असलेलं ‘दादला बुलेटवाला…’ हे गाणं बऱ्याच वैशिष्ट्यांमुळं लाँच होताच चर्चेत आलं आहे. भक्ती तुषार दळवी आणि निखिल चंद्रकांत पाटील यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचं दिग्दर्शन आाणि कोरिओग्राफी अमित बाईंग यांनी केली आहे. या गाण्याचं खास आकर्षण आहे सुशांत पुजारी… सुशांत पुजारी हे नाव एव्हाना सर्वांच्याच चांगलं परिचयाचं झालं आहे. दिग्दर्शक-कोरिओग्राफर रेमो डिसूझांच्या ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीट डान्सर’ या हिंदी सिनेमांमध्ये सिनेरसिकांनी सुशांतच्या डान्सची जादू पाहिली आहे. आता ‘दादला बुलेटवाला…’ बनून प्रथमच तो मराठीत आपला जलवा दाखवत आहे. सुशांतचा हा पहिलाच अल्बम मराठी भाषेत असणं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या गाण्यात सुशांतच्या जोडीला अमृता फडकेचं नृत्य आणि सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे. सिग्नेचर ट्युन्सचं ‘दादला बुलेटवाला…’ हे पहिलंच मराठी गाणं याच युट्युब चॅनलवर आॅनलाईन लाँच करण्यात आलं आहे.

dadla bullet wala marathi song

डीओपी अभिजीत पाटील यांनी ‘दादला बुलेटवाला…’ची सिनेमॅटोग्राफी केली आहे. गीतकार-संगीतकार श्रेयस यांनी हे गीत लिहिलं असून, कविता राम यांच्यासोबत स्वत: गात त्यांनी संगीतबद्धही केलं आहे. श्रेयसनं यापूर्वी ‘तिचा उंबरठा’, ‘गावठी (गुठून जीव… आणि भन्नाट…)’, ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी सिनेमांसाठी संगीत दिलं आहे. ‘गावठी’मधील ‘गुठून जीव…’ या गाण्यासाठी श्रेयसला सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि पुरुष पार्श्वगायकाची नामांकनंही मिळाली होती. श्रेयसच्या संगीतानं सजलेले ‘सलमान सोसायटी’, ‘कोंडी’, ‘रावस’ आणि ‘देवाक काळजी’ हे आगामी मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ मध्ये श्रेयसनं बीसीसीआय इंडीयासाठी गाणं बनवलं होतं. श्रेयसनं संगीत दिग्दर्शित केलेलं ‘तुटलेत सारे आधार…’ हे शेतकरी गीतही चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

‘दादला बुलेटवाला…’चं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी करणारे अमित बाईंग १९९६ पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून, मागील १० वर्षांपासून कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘जब तुम कहो’, ‘जाने क्यों दे यारों’ या हिंदी सिनेमांसोबतच अमित यांनी ‘कॅनव्हास’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘लालबागची राणी’, ‘चीटर’, ‘सिनीयर सिटीझन’, ‘व्हॅाट्सअप लव्ह’, ‘मिस यू मिस’ या मराठी आणि ‘कॅनव्हास’, ‘धंत्या ओपन’, ‘मि. कलाकार’, ‘दीवान हाऊस’ या गुजराती सिनेमांसाठी कोरिग्राफी केली आहे. यासोबतच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॅास’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनचं शीर्षकगीतही त्यांनी केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘अल्टी पल्टी’, ‘लग्नाची वाईफ वेडींगची बायको’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ‘डान्सिंग क्वीन’ आणि नवीन कारभारी लयभारी या मालिकांच्या शीर्षकगीतांसोबतच त्यांनी झी युवा वाहिनीचं टायटल साँगही केलं आहे. अमित यांचे ‘कला दूरीयां’, ‘सुरमई’, ‘झग्गा’, ‘सगुणा’, ‘धुके धुके’, ‘तेरी हाजरी ‌(जावेद अली)’ हे म्युझिक अल्बमही चांगलेच गाजले आहेत. जाहिरातींसोबतच विविध शोज करणाऱ्या अमित यांच्या कोरिओग्राफीची जादू रसिकांना ‘सलमान सोसायटी’, ‘मातंगी’, ‘भाता’, ‘राडा’, ‘उनाड’, ‘कल्टी’, ‘रघू ३५०’ या आगामी मराठी सिनेमांमध्येही पहायला मिळणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.