अन्या टेलर-जॉय या तरुण अभिनेत्रीच्या अभिनयाने सजलेली “क्वीन्स गँबिट” ही नेटफ्लिक्सची सर्वाधिक पाहिली जाणारी मर्यादित भागांची स्क्रिप्टेड मालिका बनली आहे. ‘क्वीन्स गँबिट’ ही १९५० च्या दशकातील बुद्धिबळाच्या खेळाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली कथा असून, स्ट्रीमर नुसार, पहिल्या २८ दिवसांत या मालिकेला ६ कोटी २० लाख मेम्बर्सने पाहिले आहे.
१९५० च्या दशकात घडलेली ‘क्वीन्स गँबिट’  ही, बेथ हार्मोन नावाच्या एका अनाथ तरुणीची कथा आहे जिच्यात बुद्धिबळाची अफाट प्रतिभा आहे व त्यातून पुढे व्यसनाधीनतेशी झगडत तिचा स्टारडमचा प्रवास सुरू करतो. वोल्टर टेव्हीस लिखित याच नावाच्या कादंबरीवर आधारित हि मालिका आहे. क्वीन्स गॅम्बिटचे लेखन आणि दिग्दर्शन स्कॉट फ्रँक यांनी केले आहे. नेटफ्लिक्सचे ‘ओरिजनल सिरीज’ चे उपाध्यक्ष पीटर फ्रीडलँडर नुसार “लेखक आणि चित्रपट निर्माता म्हणून फ्रँकच्या कौशल्याही ही खरी कसोटी आहे ज्यात त्याने अनेक बुद्धिबळ सामन्यांचे तपशील व उत्कंठा कॅमेर्‍यात टिपली आहे.”

५० चे दशक, स्त्रीवादी दृष्टिकोन, टेलर-जॉय ने साकारलेली प्रभावी बेथ, बेथची अल्कोहोलिक दत्तक आई अल्मा व्हीटली चा अभिनय यामुळे प्रेक्षकांना या मिनी सीरिजने बांधून ठेवले आहे.
Website | + posts

Leave a comment