————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

प्रतिभाशाली अभिनेत्री, शेफाली शाहचा दूसरा दिग्दर्शित लघुपट ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ (Short Film Happy Birthday Mummyji directed by Shefali Shah) संपूर्णपणे तयार आहे. हा लघुपट शेफालीद्वारे लिखीत आणि सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड द्वारा निर्मित असून रॉयल स्टैग बैरल सेलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सद्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे. ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चे कथानक हा एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते.

लघुपटाबाबत बोलताना शेफाली म्हणाली की, “ही आपल्यामधल्या सर्वांचीची गोष्ट आहे, जे आपले नाते, कुटुंब, घरामुळे ओळखले जात असतात… एक असा विकल्प जो आपण आनंदाने निवडतो. मात्र, आपण सर्वांनीच हे अनुभवले असेल कि कधी कधी या सर्व जबाबदाऱ्या सोडून देण्याची गरज निर्माण होते. कोविडमुळे झालेल्या लॉकडाउनने आपल्यावर सर्वांपासून वेगळे पडण्याची प्रबळ भावना निर्माण केली, परंतु काय झाले असते जर यावर एखादी वेगळी विचारधारा लागू करता आली असती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

शेफाली ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहानी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. ‘समडे’नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे. दशकांहून अधिक काळ गाजवणारी एक यशस्वी अभिनेत्री, शेफालीने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या ‘अजीब दास्तान्स’मधून आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. लवकरच ती आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत डार्लिंग्स मध्ये दिसणार आहे.

 

हेही वाचा – ‘सोयरीक’ जुळणार….

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.