आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

सर्वसाधारण मनोरंजन वाहिनीच्या क्षेत्रात भारतातील अग्रगण्य वाहिनी असलेल्या ‘झी टीव्ही’ने आता या वाहिनीने एक पाऊल पुढे जाऊन सध्याच्या कोविड साथीत आपल्या प्रेक्षकवर्गाचे कुटुंबीय सुरक्षित कसे राहतील, याची खबरदारी घेतली आहे. 3 ऑगस्ट पासून ‘झी टीव्ही’ वाहिनीने काही राज्यांतील आपल्या प्रेक्षकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा कॅम्प आयोजित केले महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी या वाहिनीतर्फे असे लसीकरण कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. (Zee TV kickstarts Covid Vaccination Camp for its viewers)

‘कोरोना को हराना है, तो व्हॅक्सिन लगाना है’ हा या कॅम्पचा मुख्य हेतू असून आपल्या सर्व प्रेक्षकांनी नजीकच्या व्हॅक्सीन केंद्रावर जाऊन ‘कोव्हिशील्ड’ लसीचा आपला पहिला किंवा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांना केले आहे. या कॅम्पमध्ये लसीचा डोस घेण्याची आपली वेळ निश्चित करण्यासाठी प्रेक्षकांना www.ZEETVvaccinationcamp.in या संकेतस्थळावर तसेच सरकारच्या कोविन ॲपवर आपले नाव आणि अन्य तपशिलाची नोंद करावी लागणार आहे. या कॅम्पमध्ये जो पहिला हजर होईल, त्यास प्राधान्य या तत्त्वावर लसीचा डोस दिला जाणार असून आपल्या सोशल मीडियाच्या व्यासपिठांवर प्रेक्षकांनी या संदर्भात घोषणांची नोंद घ्यावी, असे आवाहन झी टीव्हीने केले आहे. या कॅम्पमध्ये येताना संबंधित प्रेक्षकांनी आपले आधार कार्ड, कोविन नोंदणी क्रमांक सोबत आणायचा असून त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेला नोंदणीचा संदेश दाखवायचा आहे. या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या सर्वांना लसीचा डोस विनामूल्य दिला जाणार आहे. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment