फुलाला सुगंध मातीचा मालिकेत होणार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांची एण्ट्री

मालिकेत साकारणार काकीसाहेबांची भूमिका

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जीजी अक्कांनी १५ दिवसांची मुदत दिली होती. पंधरा दिवसांचा हा अवधी आता संपत आला आहे. या पंधरा दिवसात कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठी आता मालिकेत काकीसाहेबांची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक काकीसाहेबांची भूमिका साकारणार आहेत. जीजी अक्कांप्रमाणेच काकीसाहेबांचाही घरात धाक आहे. कुणीही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. त्यामुळे कीर्तीची बाजू त्या समजून घेतील की कीर्तीला आणखी कठोर परीक्षा द्यावी लागणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. कीर्तीच्या या कसोटीच्या काळात शुभम तिला कशी साथ देणार याची देखिल उत्सुकता आहे.

Usha Naik in Phulala Sugandh Maticha Star Pravah TV serial
Usha Naik in Phulala Sugandh Maticha Star Pravah TV serial

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना कीर्तीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर म्हणाली, ‘कीर्ती पहिल्यांदाच काकीसाहेबांना भेटणार आहे. त्यामुळे ती अतिशय उत्सुक आहे. काकीसाहेबांचा स्वभाव माहित नसल्यामुळे पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कीर्तीला कल्पना नाही. त्यामुळे काकीसाहेबांचं मन जिंकण्याची एकही संधी ती सोडणार नाहीय. काकीसाहेबांच्या परीक्षेत कीर्ती पास होणार का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.’

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.