सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या  जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Tu Saubhagyavati Ho Serial)

तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.

आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते.

अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘तू सौभाग्यवती हो’, विवाह सप्ताह – १ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ७ वा.  सोनी मराठी वाहिनीवर.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.