आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘Swaralata … Tula Dandavat’ on Zee Talkies on Sunday 27th March. संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर म्हणजे लता मंगेशकर…. त्यांच्या गाण्यांचा, आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्यासमोर रिता करत ‘स्वरलता… तुला दंडवत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर घेता येईल.

निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत. गायिका सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. 

‘स्वरलता… तुला दंडवत’ या सांगीतिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर होणार आहे. 

टेलिव्हिजन जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.