स्पृहणीय आणि श्रवणीय अशी सप्तसुरांची मैफिल म्हणजे कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलीय. या सुरेल मैफिलीचा महाअंतिम सोहळा रंगणार आहेयेत्या रविवारी १३ जूनला सायं. ७ वा. कलर्स मराठी वाहिनीवर !  (Sur Nava Dhyas Nava Grand Finale Round on 13th June on Colors Marathi TV Channel)

महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून या स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका ‘सूर नवा ध्यास नवा ‘च्या महामंचावर दाखल झाल्या. करोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदेडोंबिवलीची प्रज्ञा सानेबारामतीची राधा खुडेपुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. या सहाजणींना “सूर नवा ध्यास नवा”च्या या मंचावर खऱ्या अर्थानं आपापला ‘सूर नवा’ सापडला. पण आता कळणार आहेया सहाजणींपैकी कुणाचा महागायिका बनण्याचा ध्यास खरा ठरतो.

या रंगतदार महाअंतिम सोहळ्यात “सूर नवा ध्यास नवा” चे लोकप्रिय कॅप्टन्स महाराष्ट्राचा लाडका रॅाकस्टार संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय संगीताचा वारकरी महेश काळे यांचीही अदाकारी रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच या पर्वाचा संगीत समुपदेशकगायकसंगीतकार अजित परबतरूणांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर यांचे भन्नाट परफॅार्मन्स या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. 

Website | + posts

Leave a comment