स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे १०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच निर्माते महेश कोठारे देखिल उपस्थित होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जयदीप-गौरीसोबतच मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून मालिकेने यशस्वीरित्या १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जयदीप-गौरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा ज्योतिकाने प्रवेश केला आहे. गौरीला जयदीपपासून दूर करण्यासाठी तिचे प्लॅन्स सुरु आहेत. साधीभोळी गौरी ज्योतिकाला धडा शिकवणार का? हे देखिल मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असे मालिकेचे पुढील भाग असतील.

 

तेव्हा पाहायला विसरु नका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ दररोज रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

(Press Release)

Website | + posts

Leave a comment