मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे. दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला.

 

स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधणारा होता. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. रविवार ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा दैदिप्यमान सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१’ ला उपस्थित कलाकारांची काही क्षणचित्रे….

 

Website | + posts

Leave a comment