‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची” लवकरच कलर्स मराठीवर !

१८ ते २८ फेब्रुवारी वूटच्या माध्यमातून सुरू होणार ऑडिशन्सची पहिली फेरी …

मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे….. ‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची” हे नवं कोरं पर्व घेऊन!! या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे.

या नव्या पर्वाच्या ऑडिशन्सची पहिली फेरी १८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वूटच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या पर्वात ॲाडिशन्स देऊ इच्छिणाऱ्या १५ ते ३० वयोगटातील मुलींनी आपल्या आवाजातील मराठी ( अत्यावश्यक) व हिंदी गाण्यांचा व्हिडियो वूटवर पाठवायचा आहे. वूट वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. 

या अनोख्या पर्वात गायक मुलींना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा…. महाराष्ट्राच्या नव्या गायिकेचा !! या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. 

Website | + posts

Leave a comment