कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava Asha Udyachi on Colors Marathi) हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील स्पर्धकांनीनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची देखील वाहवा मिळवली.  

१६ सुरेल गायिकांचा प्रवास सुरू झाला आणि  याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे (Sanmita Dhapte Shinde)डोंबिवलीची प्रज्ञा सानेबारामतीची राधा खुडेपुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा. 

अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे सूर नवा ध्यास नवाची महागायिका होण्याचा मान पटकावला. कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपयेमानाची सुवर्णकटयार तर द्वितीय क्रमांक कोल्हापूरची संपदा माने पटकावला तिला कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह मिळाले. तृतीय क्रमांक बारामतीची राधा खुडे पटकावला तिला पंचाहत्तर रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.

Website | + posts

Leave a comment