-(Press Release)

संजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ !

महारविवार एका तासाचा महाएपिसोड संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर

 

संजीवनी आणि रणजीतच्या आयुष्यात आलेल्या कसोट्यांना ते दोघे मिळून सामोरी गेले… कितीही खडतर प्रवास असला तरी देखील या दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही… कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते हे अगदी खरे … घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य अखेर ढालेपाटील कुटुंबासमोर आले… संजु आणि रणजीत यांच संपूर्ण आयुष्य यामुळे बदललं… हे कळल्यानंतर संपूर्ण ढाले पाटील कुटुंबाची अब्रू धुळीला मिळाली… रणजीतला या सगळ्या घडल्या प्रकारामुळे खूप मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे संजुने रणजितचा विश्वास पुर्णपणे गमावला… संजु रणजीतने त्यांचे मूल गमावले… ते एकमेकांपासून दुरावले… यामुळे राजा रानीचा सुखी संसार मोडणार की काय असे वाटत असतानाच रणजीतने एक निर्णय घेतला आहे … आणि आता त्यामुळेच संजु – रणजीतची लग्नगाठ पुन्हा बांधली जाणार आहे… तेंव्हा नक्की बघा एका तासाचा महाएपिसोड ६ डिसेंबर संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…

संजु आणि रणजीतचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ? रणजीत आणि कुसुमावतीचा विश्वास संजु कसा पुन्हा मिळवेल ? कसे त्यांचे मन जिंकेल ? देवाच्या कृपेने संजुला पुन्हा एक संधी मिळाली आहे, दैवाने संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला आहे आता हे दोघे कसे नियतीवर मात करून राजा – रानीचा संसार करतील ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे… तेंव्हा पुढे काय होईल बघत रहा ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये कलर्स मराठीवर.

तेंव्हा नक्की बघा एका तासाचा महाएपिसोड ६ डिसेंबर संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.