आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

New serial Lagnachi Bedi on Star Pravah from 31st January. स्टार प्रवाहवर ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’. अभिनेत्री सायली देवधर या मालिकेत सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना सायली म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. याआधी स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकी या मालिकेतून मी भेटीला आले होते. त्यामुळे ही मालिका करताना माहेरी आल्याचं फिलिंग आहे. सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे. लहानश्या गावात वाढुनही तिची शिकण्याची इच्छा प्रबळ आहे. तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे. डॉक्टर झाल्यानंतरही गावातल्या लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे. महत्त्वाकांक्षी आणि खंबीर असं हे पात्र आहे. कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभी रहाणारी आणि स्वत:ची मतं मांडणारी अशी ही सिंधू. सिंधूचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांची ती मनापासून सेवा करते. मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी आहे. वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिंधूला तिच्या वडिलांना गमवावं लागतं. यामागे नेमकं कोणतं कारण दडलं आहे हे मालिकेतून उलगडेल.

अभिनेता संकेत पाठक दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय. ‘लग्नाची बेडी’ मालेकत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, ‘राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते. हे पात्र साकारताना एक अभिनेता म्हणून नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह सोबत जुनं नातं आहे. याधी दुहेरी आणि छत्रीवाली या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे हे नवं पात्र आणि नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

टेलिव्हिजन जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.