आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

New Marathi Serial ‘Muramba’ to hit Star Pravah from February 14.  प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर असणारी स्टार प्रवाह वाहिनी आता दुपारच्या वेळेतही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्रवाह दुपार या नव्या स्लॉट अंतर्गत लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लग्नाची बेडी ३१ जानेवारीपासून तर मुरांबा १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय मुकादम असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

या भूमिकेविषयी सांगताना शशांक केतकर म्हणाला, ‘मी खूप उत्सुक आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनीची मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. १४ फेब्रुवारीला मालिका सुरु होतेय त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.’   

टेलिव्हिजन जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.