आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Nachu Kirtanache Rangi’ to be telecast on Zee Talkies on January 16. भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. संतांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी अभंग, संतवाणी, कथा, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा तसेच चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही परंपरा जपत महत्त्वाच्या धार्मिक सणांचं औचित्य साधत त्यानंतर येणाऱ्या रविवारी नाचू कीर्तनाचे रंगी हा कीर्तनाचा विशेष सोहळा रंगणार आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण सणांची महती सांगितली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे निरूपण रंगणार आहे. रविवार १६ जानेवारीला दुपारी १२.००वा. आणि सायं ६.०० वा. झी टॉकीजवर याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. शिवलीलाताई पाटील या महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा स्त्री कीर्तनकार असून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम संपन्न होतात. 

टेलिव्हिजन जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment