आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सुंदरा मनामध्ये भरली मालिका याच तारखेला एक वर्षाआधी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाली. (Marathi TV Serial Sundara Manamadhye Bharali Completes One Year on Colors Marathi) दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ते म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप अगदी असंच मालिकेमध्ये होताना दिसू लागलं आहे. 

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला…स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो. सुंदर असणं म्हणजे नक्की काय? याचा पुन्हाएकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये भरली, प्रेक्षकांनी मालिकेला उदंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहेत, आणि याचमुळे मालिकेला आज “वर्षपूर्ती” झाली.

मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी – लतिका, अभिमन्यू, इंदू, सज्जनराव, दौलत, बापू (लतिकाचे वडील), लतिकाची आई, मिस नाशिक, हेमा, आशुदादा संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. मधुगंधा कुलकर्णी यांनी अतिशय सुंदररित्या कथेची मांडणी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने (मनवा नाईक) केली आहे. मालिकेचे दिग्दर्शक, पडद्यामागची संपूर्ण टिम खूप कष्टाने हे काम करते आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा ! 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment