आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत ‘कोण होणार करोडपती’, विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा ‘आधारवड’ असलेल्या ‘माउली सेवा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. (Kon Honaar CrorePati Special Episode with Mukta Barve and Umesh Kamat on Sony Marathi TV Channel)

मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘माउली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था गेली पंधरा वर्षं आजारी, बेघर, बेवारस अशा महिलांना कायम स्वरूपाचे उपचार आणि निवारा देण्यासाठी ‘मनगाव’ हा प्रकल्प चालवते. समाजानी, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून मुक्ता आणि उमेश हे दोघे या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर आले आहेत.

‘कोण होणार करोडपती’ – विशेष भाग, ४ सप्टेंबर, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment