फारूक कबीर यांनी जागवल्या आठवणी, खुदा हाफीजच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरच्या निमित्ताने

नुकताच रिलीज झालेल्या रोमँटिक-ऍक्शन थ्रीलर चित्रपट ‘खुदा हाफिज’ला देशभरातील नेटिझन्स आणि विद्युत च्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक फारुक कबीर या चित्रपटाला रसिकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे आनंदित आहेत. आता रविवारी दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्टार गोल्डवर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होत असल्याच्या निमित्ताने फारुकने या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता विद्युत जामवाल यांच्याबरोबर केलेल्या तयारीची आठवण करून दिली.

फारूक सांगतात की, “आम्ही उझबेकिस्तानला निघण्याच्या २ आठवड्यांपूर्वी नर्गिसच्या भूमिकेसाठी शिवालीका ची निवड झाली. तोपर्यंत मीच विद्युत बरोबर नर्गिस बनून सीन्स चा सराव केला. सुरुवातीला विद्युतला हे कठीण गेले परंतु नंतर हळूहळू सवय झाली व त्याला सूर गवसला. त्याची व्यक्तिरेखा, त्याचा विश्वास, त्याची चाल, त्याची बसण्याची पद्धत, त्याचे वजन इत्यादींवर त्याने मेहनत घेतली.” 

vidyut jammwal in khuda haafiz

ते पुढे सांगतात की, “मला माहित होतं की समीरला शोधण्याच्या प्रक्रियेत विद्युतच्या स्वतःच्या (अभिनेता म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून ) व्यक्तिमत्त्वात बदल घडून येत होते आणि समीरला  त्याची जाणीव होत होती. त्याला स्वतःमध्ये होत असलेले बदल जाणवत होते. अशावेळी एखादा कलाकार ती व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने जगत असतो. याबाबतीत मला त्याचा अभिमान वाटतो “

खुदा हाफिज हा एक रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे जो वास्तविक जीवनातील घटनांद्वारे प्रेरित आहे. फारूक कबीर दिग्दर्शित यात विद्युत जामवाल आणि शिवालीका ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. येत्या रविवारी २७ डिसेंबर रोजी  स्टार गोल्डवर दु. १२ वाजता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आहे. 

Website | + posts

Leave a comment