जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांचं जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे… मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे, त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत, त्यांनी अनेक रूप घेतली आहेत आणि आता स्वामी प्रकटदिनाच्या मंगल मुहुर्तावर श्री स्वामी समर्थ आई आदिमायेच्या रूपात दर्शन देणार आहेत…

स्वामी समर्थ म्हणजे साक्षात आई माऊलीच आहे, ह्याचा प्रत्यय भक्तांना क्षणो क्षणी येतो. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांना शासन देणारे स्वामी भक्तांचे पाठीराखे आहेत. लाबाड,दुष्ट दाजीबा आणि रामाचार्याना स्वामी शिक्षा देणार हे नक्की. अश्या सद्गुरू श्री स्वामींची भक्त संजीवनी. बिचारी निपुत्रिक म्हणून सासरी खूप छळ होत होता, म्हणून कंटाळलेली संजीवनी तिच्या आराध्य देवतेच्या आई अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरी पायीच निघाली. कितीही संकटे आली तरीही आईच्या दर्शनाला जायचं, हा संकल्प केला. पण वाटेत रामोशी मागे लागले. सर्वज्ञानी स्वामी आपल्या भक्तांवर संकट कसं येऊ देतील. त्याचवेळी अंबाबाईचा भक्त हनुमंत कोटणीस पायीच दर्शनाला निघाले होते, मात्र वाट चुकले. स्वामींनी वृध्द माणसाचे रूप घेऊन, कोटनिसाना मार्गदर्शन केलं, आणि कोटणीस आणि संजीवनी ची भेट झाली. आता या दोघांना स्वामी कसं आणि कुठे आदिमायेच्या रूपात दर्शन देणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे…

येत्या १४ एप्रिल जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samartha) मालिकेचा विशेष भाग (Prakat Deen) रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर (Colors Marathi)

Website | + posts

Leave a comment