महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi TV Serial on Sony Marathi) ही मालिका २१ जूनपासून सोम. शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. 

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. 

Website | + posts

Leave a comment