(Press Release)

महिनाभरानंतर देवाला भेटणार यासाठी मोनिका प्रचंड उत्सुक आहे. देवा आजही आपल्यावर तितकच प्रेम करतो हा विश्वास मोनिकाला आहे. पण मोनिकाचा हा विश्वास तुटणार तर नाही ना? देवा मोनिकाला बघून काय प्रतिक्रिया देणार? मोनिका देवाचा निर्णय मान्य करेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.

सध्या मालिकेत प्रेक्षक पाहत आहेत कि जवळपास महिनाभरानंतर डॉली म्हणजेच मोनिका परत येत असून तिच्या स्वागताची जंगी तयारी आजी, कबीर आणि राधा करत आहेत. अशातच कबीरचं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी म्हणजेच राधा हे सत्य देवासमोर येतं आणि तो पुरता कोलमडतो. नियतीने हा काय डाव आपल्यासमोर टाकलाय या विचाराने देवा अस्वस्थ होतो. त्याला काय करावे सुचत नाही. पण अखेर तो एका निर्णयावर पोहोचतो. राधाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी आपण डॉलीबाईंना विसरायचे, त्यांची आणि आपली लव्हस्टोरी पुढे जाऊ शकत नाही हा निर्णय देवा घेतो. आणि दुसरीकडे महिनाभरानंतर देवाला भेटणार यासाठी मोनिका प्रचंड उत्सुक आहे. देवा आजही आपल्यावर तितकच प्रेम करतो हा विश्वास मोनिकाला आहे. पण मोनिकाचा हा विश्वास तुटणार तर नाही ना? देवा मोनिकाला बघून काय प्रतिक्रिया देणार? मोनिका देवाचा निर्णय मान्य करेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

‘डॉक्टर डॉन’ मालिकेच्या अधिक माहितीसाठी, झी 5 ला भेट द्या आणि मिळावा आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स एक दिवस आधी!

प्रोमो लिंक:
https://f.io/5PDZNDT2

Website | + posts

Leave a comment