मालिकेच्या टीमने कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्थेतील मुलांसोबत साजरा केला खास दिवस

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. कोल्हापूरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत मालिकेच्या टीमने १०० भागांच्या पूर्ततेचा आनंद साजरा केला. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अक्षम मुलांचं संगोपन करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.

100 Episode Celebration of Dakhkhancha Raja Jyotiba Team with Celebrates with Chetana Vikas Sanstha
100 Episode Celebration of Dakhkhancha Raja Jyotiba Team with Celebrates with Chetana Apangmati Vikas Sanstha

मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ज्योतिबा आणि मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेत त्यांनी मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच रोमहर्षक असणार आहे. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.