कोणत्‍याही कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई म्‍हणजे त्‍याच्‍या अभिनयाची प्रेक्षकांनी केलेली प्रशंसा. तसेच कलाकार त्‍यांच्‍या कुटुंबाकडून मोठे प्रोत्‍साहन व पाठिंबा देखील मिळवतात. याबाबत सांगताना एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका हप्‍पू की उलटन पलटन‘ (Happu Ki Ultan Paltan TV Serial on & TV) मधील दरोगा हप्‍पू सिंगच्‍या भूमिकेसाठी घराघरामध्‍ये लोकप्रिय बनलेले योगेश त्रिपाठी (Yogesh Tripathi as Happu Singh) यांनी नुकतेच त्‍यांचा मुलगा दिशूसोबत घडलेल्‍या एका मजेशीर क्षणाबाबत सांगितले. तेल लावलेल्‍या विशिष्‍ट केशभूषेसह आठ वर्षांचा दिशू त्‍याचे वडिल योगेश यांच्‍याकडे गेला आणि म्‍हणाला ‘नियोच्‍छावर कर दो’.

दरोगा हप्‍पू सिंगची स्‍टाइल, भाषाशैली व हावभावाचे अनुकरण करताना त्‍याला पाहून ते भारावून गेले. ते त्‍यांचा आनंद लपवू शकले नाहीत आणि त्‍यांच्‍यासाठी तो अत्‍यंत अभिमानास्‍पद क्षण होता. याबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ” तो माझ्यासाठी अत्‍यंत संस्‍मरणीय क्षण होता. मला इतका आनंद कधीच झाला नाही आणि सोबतच मी भारावून देखील गेलो. इतका की मला माझ्या भावना शब्‍दांमध्‍ये व्‍यक्‍त करता येऊ शकत नाहीत. मला खूपच आनंद होण्‍यासोबत अभिमानही वाटला. मुलांबाबत सर्वोत्तम बाब म्‍हणजे ते निरागस असतात, त्‍यांचे मन निर्मळ असते आणि ते काहीही विचार न करता खुल्‍यामनाने बोलतात. माझ्यासाठी दिशू हा माझा सर्वात मोठा समीक्षक आहे. त्‍याला हप्‍पू सिंगप्रमाणे पेहराव करायला आवडते. तो त्‍याच्‍या शर्टमध्‍ये उशी ठेवतो, त्‍याच्‍यासारखीच केशभूषा करतो आणि दरोगासारखा घरामध्‍ये अभिनय करतो. या लहान हप्‍पूसमोर मोठा हप्‍पू देखील फेल आहे. आम्‍ही सर्व ‘हप्‍पू की उलटन पलटन’चे सर्व एपिसोड्स पाहतो. दिशूला काही सीन्‍स लक्षात आहेत आणि तो इतक्‍या सराईतपणे ते सीन्‍स सादर करतो की मी देखील अचंबित होतो. त्‍याने मला नुकतेच आव्‍हान केले की, तो माझ्यापेक्षा उत्तमरित्‍या हप्‍पू सिंगची भूमिका साकारू शकतो. मला सांगावेसे वाटते की, तो हप्‍पूचा मोठा प्रतिस्‍पर्धी आहे (हसतो). तो माझा सर्वात मोठा आदर्श व प्रेरणास्रोत आहे. माझ्या भूमिकेप्रती त्‍याच्‍या आवडीमधून मला माझ्या मर्यादा दूर करत अधिक मेहनत घेण्‍यास आणि माझ्या लहान हप्‍पूला आनंदी व अभिमानास्‍पद करण्‍यास प्रोत्‍साहन मिळते.”

हेही वाचा –

  • Ulajh Official Teaser
  • SRIKANTH Official Trailer
  • Heeramandi: The Diamond Bazaar Official Trailer
  • Do Aur Do Pyaar Movie Review | एक बार भी रहने दो यार
Website | + posts

Leave a comment