स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेचे २५० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करायचं ठरवलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींनी पुण्याजवळच्या ‘आपलं घर’ या संस्थेला भेट दिली. विशेष गोष्ट म्हणजे मालिकेच्या संपूर्ण टीमने आपलं एक दिवसाचं मानधन या संस्थेला भेट म्हणून दिलं.

Aai Kuthe Kaay Karate 250 episodes celebration cake

आई कुठे काय करते मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाविषयी सांगताना दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले, ‘आपलं घर ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करत आहे. अनेक कलाकारदेखिल या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहिती होती. त्यामुळेच आई कुठे काय करतेच्या २५० भागांचं सेलिब्रेशन आम्ही आपलं घर मधील या खास परिवारासोबत करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण टीमने अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं.’

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच २५० भागांचा टप्पा गाठणं शक्य झालं. यापुढेही मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहिल ही आशा आहे. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.