आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Veteran actor Sunil Shende passed away. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. सुनील शेंडे यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. गांधी, वास्तव, सरफरोश या चित्रपटांमधील भूमिकांसाठी विशेष करून सुनील शेंडे यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. 

काल रात्री उशिरा १ वाजता विले पार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं असून आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर, मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार  होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेते अशी त्यांची ओळख होती. 

त्यांच्या खड्या आवाजामुळे पोलीस, राजकारणी अशा विविधांगी भूमिकांमधून ते रसिकांच्या लक्षात होते. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, ईश्वर, नरसिंहा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.