तिसरा न्यू जर्सी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (एनजेआयआयएफएफ) नुकताच ऑनलाईन प्लॅटफॉर्म मूव्ही सेंट्सच्या माध्यमातून पार पडला. या फेस्टिव्हलला प्रेक्षक मोठ्या संख्येने जगभरात ऑनलाइन पाहत असल्याने, समापन व पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपित करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध संस्कृतींचे सुमारे ४० चित्रपट दाखविण्यात आले. यामध्ये शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स व डॉक्युमेंटरी यांचा समावेश होता. ‘शॉर्टफिल्म’ विभागात ‘टिंडे’ या शॉर्टफिल्म साठी अभिनेत्री अश्विनी काळसेकर ला तिच्या जबरदस्त अभिनयाबद्दल उत्कृष्ट अभिनेत्री व फिल्ममेकर सीमा देसाई ला ‘टिंडे’ साठीच सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला. 

 

सेजल कौशिक आणि पराग देसाई निर्मित ‘टिंडे’ मध्ये अदा शर्मा, राजेश शर्मा आणि अश्विनी काळसेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आता लार्ज शॉर्ट फिल्म यु-ट्यूब चॅनेलवर बघता येईल. 

 

Website | + posts

Leave a comment