आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The shooting of the action entertainer film ‘Bade Miyan Chhote Miyan’ has started in Mumbai. पूजा एंटरटेनमेंटचा आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार असून पृथ्वीराज सुकुमारन देखील या सिनेमाद्वारा खलनायकाच्या व्यक्तीरेखेतून आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्शकांच्या भेटीला येणार आहेत. अली अब्बास जफरद्वारा दिग्दर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या शूटिंगची शुभ मुहूर्तावर सुरुवात केली.

वाशू भगनानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या मुहूर्त शॉटबद्दलचा उत्साह व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vashu Bhagnani (@vashubhagnani)

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा प्रोड्युस्ड, वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत आणि अली अब्बास जफरद्वारा लिखित आणि दिग्दर्शीत तसेच, एएझेड फिल्मच्या सहयोगाने पूजा एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘बड़े मियां छोटे मियां’हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment